श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचालित श्री दत्त विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर चे मुख्याध्यापक / प्राचार्य श्री सुनील उत्तम पाटील सर यांचा नियत वयोमानाने सेवानिवृत्ती निमित्त संस्थेचे सचिव माननीय Adv. वैभवजी टोमके साहेब आणि ज्येष्ठ संचालक माननीय अनिरुद्धभाऊ सालविठ्ठल साहेब यांनी सत्कार केला. तसेच विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर चे प्राचार्य डॉ. उत्तरेश्वर मुंढे सर यांनी प्रशालेतर्फे त्यांचा सत्कार केला.
या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांच्या पुढील जीवन प्रवासासाठी आरोग्य, आनंद आणि यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.








